कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांचा ''मिडनाईट'' दणका

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांचा ''मिडनाईट'' दणका
Published on

वाहतूक पोलिसांचा ‘मध्यरात्री’ दणका
कल्याणमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
कल्याण, ता. ६ (बातमीदार) : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिस आता पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. रविवारी (ता. ५) मध्यरात्री पोलिसांनी शहराच्या विविध भागांत अचानक ‘मिडनाइट’ मोहीम राबवून नियम मोडणाऱ्या शेकडो वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेजबाबदार चालकांची चांगलीच पळापळ झाली.

वाहतूक पोलिसांनी प्रामुख्याने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. या मोहिमेत गाड्यांच्या काचांवर बेकायदा लावलेल्या फिल्म जागीच फाडून टाकण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अस्पष्ट नंबर प्लेट्स असलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्यात आले. तसेच ज्या गाड्यांना नंबर प्लेट नाहीत किंवा तुटलेल्या आहेत, अशा वाहनचालकांकडून मोठा दंड वसूल करण्यात आला. शहरातील वाहतूक शिस्त टिकवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी अशी ‘मिडनाइट’ कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील. वाहनचालकांनी रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन कल्याण वाहतूक विभागाने केले आहे.

नाकाबंदीमुळे चालकांची धांदल
मध्यरात्री अचानक लावलेल्या नाकाबंदीमुळे नियम मोडणाऱ्या अनेक चालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रत्येक प्रमुख चौकात लावलेल्या सापळ्यात ते अलगद अडकले. गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी वाढणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com