घरगुती गॅसचा बेकायदा वापर उघड

घरगुती गॅसचा बेकायदा वापर उघड
Published on

घरगुती गॅसचा बेकायदा वापर उघड
सांताक्रूझमधील खाणावळीवर धाड
जोगेश्‍वरी, ता. ६ (बातमीदार) ः सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला परिसरात व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदा वापर करणाऱ्या एका खाणावळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत १७ हजार ११२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संबंधित हॉटेलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शुक्रवारी (ता. ३) शिधावाटप कार्यालय क्र. २३/ड, सांताक्रूझ (पूर्व) येथील अधिकाऱ्यांना वाकोला ब्रिज परिसरातील एका भोजनालयात घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनियंत्रक भास्कर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप निरीक्षक प्रशांत नाखवा, अधिकारी किरण गवांदे व त्यांच्या पथकाने दत्त मंदिर रोडवरील भोजनालयात छापा टाकला. हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरवर पुऱ्या तळण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. भोजनालयाच्या मालकाच्या चौकशीत व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नसल्याने पालघर येथील घरातून घरगुती सिलिंडर आणून वापर केल्याची कबुली दिली. वाकोला पोलिस ठाण्याचे कर्मचारी दीपक खरात यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com