

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडीतील बांधकाम व्यावसायिकाकडे कोट्यवधी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. नारपोली पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी पती-पत्नी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, व्यावसायिक आणि मुख्य आरोपी नवीन चिंतला यांच्यात २०१२ ते २०१७ दरम्यान ३६.५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. हा व्यवहार पूर्णतः संपुष्टात आला असतानाही २०२२ पासून आरोपींनी पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. व्हॉट्सॲपद्वारे शस्त्रासह स्वतःचे फोटो पाठवत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर विविध टप्प्यांत २० लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपयांची मागणी केली. तक्रारीनुसार, आरोपीचा साथीदार अल्ले नागराजू यानेही फोनवरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अल्ले नागराजूला अटक केली आहे. दरम्यान, नवीन चिंतला आणि त्याची पत्नी लया चिंतला हे परदेशात फरार झाल्याचे वृत्त आहे. नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.