डिजिटल कारभारासाठी नगरसेवकांना टॅब

डिजिटल कारभारासाठी नगरसेवकांना टॅब
Published on

तुर्भे, ता. ६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या कारभारात डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात तब्बल नऊ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

नवी मुंबई स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहर चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही स्मार्ट पद्धतीने काम करावे, या उद्देशातून ही योजना राबवण्यात येत आहे. या टॅबच्या माध्यमातून महापालिकेच्या सूचना, विविध विकासकामांचे प्रस्ताव, प्रकल्पांची माहिती, तसेच सभांचा अजेंडा व कार्यक्रम डिजिटल स्वरूपात नगरसेवकांना उपलब्ध होणार आहेत.

महापालिकेचे बहुतांश कामकाज आधीच ‘ई-ऑफिस’ प्रणालीवर आधारित झाले आहे. त्यामुळे कागदविरहित (पेपरलेस) प्रशासनाचा पुढील टप्पा म्हणून नगरसेवकांनाही डिजिटल साधनांची जोड दिली जात आहे. यामुळे कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत होणार असून, प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रभाग निधीसाठी १११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबईत १११ प्रभाग असल्याने प्रत्येक नगरसेवकाला सुमारे एक कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे स्थानिक विकासकामांना चालना मिळणार आहे. एकूणच डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असले तरी, त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि पारदर्शकता यावरच या योजनेचे यश अवलंबून राहणार आहे.

यापूर्वीही वाटप
२०१० मध्येही महापालिकेने नगरसेवकांना टॅब दिले होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर हे टॅब परत घेण्यात आले होते; पण त्या टॅबचे पुढे काय झाले, त्याचा वापर कसा झाला किंवा ते कुठे गेले, याबाबत आजही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन टॅबच्या वापरावर आणि देखरेखीवर अधिक काटेकोर यंत्रणा उभी करण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com