प्रा.डॉ.अजित मगदूम यांना राज्यस्तरीय गांधी पुरस्कार प्रदान

प्रा.डॉ.अजित मगदूम यांना राज्यस्तरीय गांधी पुरस्कार प्रदान
Published on

प्रा.डॉ.अजित मगदूम यांना राज्यस्तरीय गांधी पुरस्कार प्रदान
व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याची दखल
नवी मुंबई (वार्ताहर) : व्यसनमुक्ती क्षेत्रातील प्रभावी लेखन, जनजागृती आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत प्रा.डॉ.अजित मगदूम यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
व्यसनमुक्ती, व्यसन प्रतिबंध, उपचार आणि समाजजागृती या विषयांवर विविध वर्तमानपत्रांतून प्रा.डॉ.मगदूम यांनी लेखन केले आहे. याशिवाय नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य प्रकाशित करीत असलेल्या कल्याण यात्रा या मासिकातही त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले असून, ते सातत्याने व्यसनमुक्तीविषयक प्रबोधन करत आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ते व्यसनमुक्ती प्रतिबंध आणि उपचार या क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. सध्या ते वाशी येथील अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक म्हणून कार्य पाहत असून, नशाबंदी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तसेच व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे सदस्य म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com