चिकणीपाड्यात ''विठ्ठल सीसी प्रीमिअर लीग''चा थरार

चिकणीपाड्यात ''विठ्ठल सीसी प्रीमिअर लीग''चा थरार
Published on

चिकणीपाड्यात ''विठ्ठल प्रीमियर लीग''चा थरार
‘साई पॅकर्स’ संघ ठरला पहिला मानकरी
कल्याण, ता. ६ (बातमीदार) : चिकणीपाडा परिसरात क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला होता. स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात ‘विठ्ठल क्रिकेट क्लब’ आयोजित ‘विठ्ठल प्रीमियर लीग’चा पहिला हंगाम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या चुरशीच्या स्पर्धेत दर्शन शेट्ये यांच्या ‘साई पॅकर्स’ संघाने चमकदार कामगिरी करत पहिल्यावहिल्या चषकावर आपले नाव कोरले.

परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणताही व्यावसायिक खेळाडू नव्हता. केवळ चिकणीपाडा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या खेळाडूंसाठीच ही स्पर्धा मर्यादित ठेवण्यात आली होती, ज्यामुळे अनेक नवीन तरुणांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली.

स्पर्धेचे स्वरूप व्यावसायिक नसले तरी नियोजन मात्र अत्यंत शिस्तबद्ध होते. आयपीएलच्या धर्तीवर दोन आठवड्यांपूर्वी ५० हून अधिक खेळाडूंचा ‘लिलाव’ पार पडला होता. परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिकांनी संघांची मालकी स्वीकारून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

अंतिम सामन्याचा थरार
स्पर्धेत साई पॅकर्स, साईशा स्ट्राईकर्स, अविरा चॅलेंजर्स, टीम एसएम सिक्स हे चार संघ सहभागी झाले होते. एकूण १२ साखळी सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल ठरलेल्या दोन संघांमध्ये अंतिम झुंज रंगली. अंतिम सामन्यात दर्शन शेट्ये यांच्या साई पॅकर्स संघाने अष्टपैलू खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यावर दणदणीत विजय मिळवला. अनुभवी कर्णधार ओमकार शिंदे याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला जेतेपद मिळवून दिले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला ‘मालिकावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com