ठाण्यात पुन्हा बनावट पोलिस अधिकाऱ्यांचा सापळा

ठाण्यात पुन्हा बनावट पोलिस अधिकाऱ्यांचा सापळा
Published on

बनावट पोलिसांनी ज्येष्ठांना लुटले
१० लाखांचा ऐवज लंपास
ठाणे, ता. ६ : शहरात ‘पोलिस बोलवत आहेत’ किंवा ‘पुढे चोरी झाली आहे’ असा बनाव करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. घोडबंदर रोडवरील आनंदनगर आणि वर्तकनगर परिसरात एकाच दिवशी घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये बनावट पोलिसांनी दोन वृद्धांना गाठून सुमारे नऊ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले. या घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पहिली घटना कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ईवा वर्ल्ड स्कूलजवळ घडली. किरण वैद्य (वय ६३) हे ४ एप्रिल रोजी सकाळी फिरून परतत असताना दोघांनी त्यांना अडवले. येथे चैन स्नॅचिंग झाली आहे, साहेब पुढे तपासणी करत आहेत, तुमचे दागिने काढून खिशात ठेवा, असे सांगून त्यांनी वैद्य यांचा विश्वास संपादन केला. दागिने कागदात गुंडाळून देण्याचा बनाव करत त्यांनी वैद्य यांच्या हातातील सोन्याची साखळी, ४० ग्रॅमचे कडे आणि दोन हिऱ्यांच्या अंगठ्या असा एकूण सहा लाख ८० हजारांचा ऐवज लंपास केला आणि त्यांच्या हातात कागदाचा बनावट पुडा टेकवला.

दुसरी घटना वर्तकनगरमधील पोखरण रोड क्रमांक १ परिसरात घडली. व्यंकटेश अय्यर (वय ७७) हे मारुती दर्शनासाठी जात असताना एका इसमाने त्यांना थांबवून आगे पोलिस खडी है अशी बतावणी केली. त्यानंतर तिथे आलेल्या दोन साथीदारांनी त्यांना गळ्यातील चेन काढून बॅगेत ठेवण्यास सांगितले. अय्यर यांनी चेन काढताच आरोपींनी हातचलाखीने ती गायब केली आणि तेथून पसार झाले. संशय आल्यावर अय्यर यांनी बॅग तपासली असता, सुमारे तीन लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कासारवडवली आणि वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com