विनापरवाना वीटभट्ट्यांचा ''धूर''; प्रदूषण वाढले

विनापरवाना वीटभट्ट्यांचा ''धूर''; प्रदूषण वाढले
Published on

विनापरवाना वीटभट्ट्यांचा ‘धूर’ वाढला
वायुप्रदूषणाचा चढता आलेख पाहता ग्रामस्थांची कारवाईची मागणी

जव्हार, ता. ६ (बातमीदार) : जव्हार शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही खासगी तसेच शासकीय बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा परिस्थितीत बांधकामासाठी लागणारे साहित्य ठिकठिकाणी उपलब्ध होऊ लागले आहेत. वाढती मागणी पाहता, या व्यवसायात काही अनधिकृत गोष्टीही घडू लागल्या असून, विनापरवाना वीटभट्ट्या या जागोजागी दिसू लागल्याचे चित्र येथे पाहण्यास मिळत आहे. या अनधिकृत वीटभट्ट्यांंमुळे वाढते वायुप्रदूषण पाहता स्थानिक नागरिकांनी आता त्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुंदर व निसर्गसंपन्न अशा जव्हात तालुक्यात सध्या पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध वीटभट्ट्यांनी ठाण मांडले आहे. एकीकडे प्रशासनाच्या वतीने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे तालुक्यात फोफावलेल्या या भट्ट्यांमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या अवैध व्यवसायामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून, प्रशासकीय अनास्थेमुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.

----------------
श्वसन, त्वचारोग वाढले

या वीटभट्ट्यांमधून निघणारा धूर परिसरातील नागरिकांसाठी संथ विष ठरत आहे. पर्यावरणप्रेमींच्या मते या भट्ट्यांमधून सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि पीएम २.५ व पीएम १० सारखे अतिसूक्ष्म घातक कण हवेत मिसळत आहेत. डॉ. रितेश पाटील यांनी सांगितले की, या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार, त्वचारोग आणि अस्थमासारख्या व्याधींचे प्रमाण तालुक्यात कमालीचे वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्धांना बसत आहे.
---------------
महसूल बुडीत आणि प्रशासकीय डोळेझाक

तालुक्यात सुमारे शेकडो वीटभट्ट्या सुरू असून, त्यातील बहुतांश भट्ट्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची किंवा तहसील प्रशासनाची कोणतीही रीतसर परवानगी नाही. मोजक्याच रॉयल्टीच्या पावत्या फाडून हजारो ब्रास माती लंपास केली जात असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
------
जव्हार तालुक्यात वीटभट्टी व्यावसायिकांनी रीतसर परवानगी घेतली आहे. मात्र, ज्या कोणी व्यावसायिकांनी विनापरवाना वीटभट्टी व्यवसाय सुरू केला असेल, अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com