

ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग कामाला अटी
मातीची वाहतूक भूमिगत मार्गाने; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर स्थानिकांना दिलासा
ठाणे, ता. ६ : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पाच्या खोदकामातून निघणारी माती शक्यतो भूमिगत मार्गानेच वाहून नेली जाईल, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले असून, नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाणे-बोरिवली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात मंगळवारी (ता. ७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष भुयार खोदाईला सुरुवात होईल. या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली दरम्यानचा दीड तासांचा प्रवास केवळ १५ मिनिटांवर येणार आहे; मात्र खोदाईदरम्यान निघणाऱ्या प्रचंड मातीच्या वाहतुकीमुळे परिसरात धूळ, ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडी वाढण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली होती.
स्थानिक रहिवाशांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यावर तातडीने निर्णय घेत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की खोदाईतील मातीची वाहतूक नागरी वस्तीतून करण्याऐवजी भूमिगत मार्गाचाच वापर केला जाईल. प्रकल्पाच्या कामामुळे नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास काम त्वरित थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. धुळीचा त्रास होऊ नये यासाठी संबंधित प्राधिकरणाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.
प्रकल्प शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे; मात्र विकास करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. मातीची वाहतूक भूमिगत पद्धतीने करून प्रदूषण टाळण्यावर आमचा भर आहे.
-एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.