अंगणवाडी सेविका जीविता पाटील यांना ‘राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार’

अंगणवाडी सेविका जीविता पाटील यांना ‘राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार’
Published on

अंगणवाडी सेविका जीविता पाटील यांना ‘राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार’
सामाजिक कार्य व उच्च शिक्षणासाठी सन्मान; महिलांसाठी प्रेरणादायी वाटचाल
अलिबाग, ता. ६ (वार्ताहर) : अंगणवाडी सेविका जीविता सूरज पाटील यांना पुणे येथे स्पंदन फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात ‘राज्यस्तरीय स्पंदन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात झालेल्या या सोहळ्यात सेल्सटॅक्स इन्स्पेक्टर प्रणाली देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फाउंडेशनचे अध्यक्ष सागर पाडाळे यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस इन्स्पेक्टर अश्विनी पाटील, विद्यानिकेतन अध्यक्ष शशिकांत कोचळे तसेच स्पंदन फाउंडेशनचे पदाधिकारी, संचालक मंडळ व राज्यभरातील पुरस्कार्थी उपस्थित होते.
जीविता पाटील यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असताना एम. ए. व एलएलएमपर्यंत शिक्षण पूर्ण करून अनेक महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यशस्वी होण्यासाठी जिद्द, स्पष्ट ध्येय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com