भाजप जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी रामभाऊ दळवी

भाजप जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी रामभाऊ दळवी
Published on

मुरबाड (बातमीदार) : भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी नुकतेच त्यांना नियुक्तिपत्र दिले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दळवी हे सुभाष पवार यांचे खंदे समर्थक आहे. पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दळवी यांनीही त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केला; मात्र, आतापर्यंत त्यांना कोणतेही पद देण्यात आले नाही. अखेर त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे मुरबाड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. विविध स्तरांतून दळवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com