माळीपाडा गावातील विद्यार्थिनीला मदतीचा हात

माळीपाडा गावातील विद्यार्थिनीला मदतीचा हात
Published on

मुरबाड, ता. ६ (वार्ताहर) : तालुक्यातील माळीपाडा गावातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणारी नववीची विद्यार्थिनी श्रावणी माळी हिला शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला आहे.
भरत दळवी युवा विकास मंच, मुरबाड विधानसभा यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी आवश्यक मदत केली. मुरबाड येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनीही यामध्ये सहकार्य केले. डॉ. तेजस घुडे, रायते गावातील सुदाम भोईर आणि भरत दळवी युवा विकास मंच यांच्या माध्यमातून श्रावणीला भविष्यातही शैक्षणिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती भरत दळवी यांनी दिली. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांची आवश्यकता असून, समाजातील इतरांनीही पुढाकार घ्यावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com