

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणे हेच आपले कर्तव्य : पी. बी. सरफळे
रोहे ज्येष्ठ संघटनेची सभा उत्साहात; विविध उपक्रमांचा आढावा
रोहे, ता. ६ (बातमीदार) : ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयानुसार अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना मदत करून दिलासा देणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रोहे ज्येष्ठ संघटनेचे अध्यक्ष पी. बी. सरफळे यांनी केले. ते ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित सभेत बोलत होते.
या वेळी उपाध्यक्ष एस. एन. गायकवाड, सचिव सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटील यांच्यासह सुमारे १०० सदस्य उपस्थित होते. सरफळे यांनी संघटनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करणे, आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच चालण्यासाठी स्टिकचे वितरण यांसारख्या उपक्रमांमुळे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच बँकिंग सेवांमध्ये ज्येष्ठांना सुलभता मिळावी यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करतात व समस्या मांडतात. त्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फोटो कॅप्शन : नवीन सदस्य शिरीष अंब्रे यांनी मंडळाचा सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांचा सन्मान करताना अध्यक्ष पीबी सरफळे, उपाध्यक्ष एस.एन. गायकवाड, सुरेश मोरे सर व आदी मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.