रायगडच्या युवकांनी जिंकली कबड्डी प्रेमी प्रेक्षकांची मने

रायगडच्या युवकांनी जिंकली कबड्डी प्रेमी प्रेक्षकांची मने
Published on

रायगडच्या युवकांनी जिंकली कबड्डी प्रेमी प्रेक्षकांची मने
उद्या रायगड विरुद्ध अहिल्यानगर उपांत्य फेरीचा धरार
रोहा, ता. ६ (बातमीदार) ः रायगडच्या युवा कब्बडीपट्टूंनी ७३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सांगली जिल्ह्यावर शानदार मात करून उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. नाशिक येथील सिन्नर येथे या महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद स्पर्धा सुरु आहे. बाद फेरीतील विजयी खेळीमुळे आत्ता रायगडकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यानिमित्त सर्वच स्तरावरून प्रशिक्षक, संघव्यवस्थापक आणि निवड समितीचे अभिनंदन केले जात आहे.
उपउपांत्य फेरीची लढत रंगतदार झाली. त्या प्रामुख्याने राज मोरे यांच्या अफलातून सुपर टॅकलनी प्रतिस्पर्धी संघाला सळो कि पळो करून सोडले. निर्णायक, पकडच्या जोरावर नीरज मिळास, विपुल मोकळ, राज मोरे, राज जंगम यांच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर सांगलीसारख्या मजबूत संघावर दोन गुणांनी विजय मिळवत उपांत्य फेरीमध्ये थेट प्रवेश मिळविला आहे. मंगळवारी (ता. ७) सायंकाळी रायगड विरुद्ध अहिल्यानगर असा सामना होईल. महत्वाच्या लढतीला कबड्डी प्रेमी, खेळाडू, प्रेक्षकांनी शुभेच्छा देत रायगडकर अंतिम विजयाची प्रतीक्षा करीत आहेत.

फोटो कॅप्शन : सांगली जिल्ह्याचा पराभव केल्यानंतर आंनदोत्सव साजरा करताना रायगडचा कब्बडी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com