अंदाजपत्रकाची प्रतिवरून संताप

अंदाजपत्रकाची प्रतिवरून संताप
Published on

वाशी, ता. ६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २०२६-२७ च्या अंदाजपत्रकाची प्रत प्रसारमाध्यमांना न मिळाल्याने सोमवारी (ता. ६) अर्थसंकल्पाच्या बैठकीत शिवसेना गटनेते मनोज हळदणकर यांनी मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. पालिकेकडून फक्त १३० प्रति छापण्यात आल्याचे स्पष्ट केले, तर पालिकेच्या काही नगरसेवकांना प्रतदेखील उशिरा मिळाली असल्याने त्यांना फक्त दोनच दिवस अभ्यास करण्यास वेळ मिळाला असल्याचे हळदणकर यांनी स्पष्ट केले. प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना अंदाजपत्रकाची प्रत न मिळाल्याने त्यानी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत सभागृहवर बहिष्कार टाकत आयुक्तांची भेट घेतली. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मुख्य लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांना दोन तासात प्रत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com