

‘निसान’कडून नेटवर्कचा विस्तार
मुंबईत तीन नवीन टचपॉइंट्सचे उद्घाटन
मुंबई, ता. ६ : निसान मोटर इंडिया प्रा. लिमिटेडकडून (एनएमआयपीएल) मुंबईत अत्याधुनिक लक्ष्मी निसान शोरूम आणि कार्यशाळा सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात निसानकडून नेटवर्कचा विस्तार करण्यात येत आहे.
निसानच्या नव्या सुविधांमध्ये प्रत्येकी चार गाड्यांची प्रदर्शन क्षमता असलेली घाटकोपरमध्ये २,००० चौरस फूट क्षेत्रात तसेच मालाडमध्ये २,१०० चौरस फुटांची शोरूम आणि कांदिवलीत मासिक ३०० गाड्यांना सर्व्हिसिंग व सुट्या भागांचे पाठबळ देऊ शकणाऱ्या ७,००० चौरस फूट क्षेत्रातील पूर्णपणे सुसज्ज सेवा कार्यशाळेचा समावेश आहे. निसानच्या जागतिक रिटेल मानकांच्या अनुषंगाने तयार केलेली अत्याधुनिक शोरूम्स उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहेत आणि वाहन खरेदीचा उत्कृष्ट अनुभव व अद्वितीय ग्राहक मूल्य देण्यासाठी वचनबद्ध असलेल्या कंपनीकडून सांगण्यात आले. निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, की मुंबईत आमच्या नवीन शोरूम आणि कार्यशाळा सुविधांच्या उद्घाटनासह महाराष्ट्रात आमची उपस्थिती बळकट करताना आम्हाला आनंद होत आहे. निसान ब्रँडच्या वाढीला चालना देताना या प्रदेशात ग्राहकांकडून जोरदार मागणी दिसून येत आहे. हा विस्तार आमच्या राष्ट्रव्यापी नेटवर्क विस्ताराचा एक अविभाज्य भाग आहे, जो आमच्या ग्राहकांजवळ जाण्याच्या आणि वाहन खरेदीचा उत्तम अनुभव देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या निसान ग्रॅव्हाइटसह आम्ही आमच्या उत्पादनांच्या विक्रीला चालना देत आहोत. त्यामुळे नेटवर्क विस्तार हा आमच्या धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे.
..
सुविधा, सेवांसाठी बांधिलकी
लक्ष्मी निसानचे मुख्य वितरक के. जयराम यांनी सांगितले, की मुंबईत या नवीन सुविधांमुळे महाराष्ट्रात कंपनीची उपस्थिती वाढवण्यासाठी निसान मोटर इंडियाशी भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. निसानच्या उत्तम उत्पादन पोर्टफोलिओ आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोनाच्या पाठिंब्याने ग्राहकांना जागतिक दर्जाची रिटेल सुविधा आणि सेवा अनुभव प्रदान करण्याची आमची बांधिलकी या विक्रेत्यांमध्ये प्रतिबिंबित होते. आम्ही मुंबई आणि आसपासच्या भागातील ग्राहकांना दर्जेदार खरेदी अनुभव आणि विक्रीनंतरच्या पाठबळासह सेवा देण्यास उत्सुक आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.