बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी - आशिष शेलार

बारामती पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी - आशिष शेलार
Published on

बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी
- आशीष शेलार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी केले. एखाद्या वरिष्ठ नेत्याच्या निधनानंतर राज्यात पोटनिवडणूक सर्वानुमते पार पाडण्याची परंपरा असून, ती अबाधित ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या पक्ष स्थापना दिनानिमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार का, या प्रश्नावर शेलार यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र राज्यातील परंपरेनुसार अशा निवडणुका सर्वांच्या सहमतीने बिनविरोध पार पाडल्या जातात. सर्व पक्षांनी या संकेताचा आदर राखत निर्णय घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अशोक खरात प्रकरणातील फोन कॉलच्या सीडीआर प्रकरणी उबाठाच्या नेत्यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे यापुढे अनावश्यक चर्चा टाळावी, असेही शेलार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com