

एसआयआयएलसी
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी
पुणे, ता. ६ : प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी हा एक विशेष प्रकार आहे. सध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्ट्सचे वेगळेपण फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून अधिक उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचते. याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण ११ एप्रिलला आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीच्या प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लूक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
व्यावसायिक मसाले कार्यशाळा
घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाइल मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा ११ व १२ एप्रिलला आयोजिली आहे. यात १० प्रकारचे मसाले प्रत्यक्ष तयार करून शिकविले जातील. यामध्ये पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटण, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा लसूण, मिसळ, गोडा, पेरी पेरी, गरम इत्यादी मसाले प्रात्यक्षिकांसह शिकवले जातील. दुसऱ्या दिवशी मसाला व्यवसाय उभे करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मसाला व्यवसायाला असणारी मागणी व त्याचे स्वरूप, उपलब्ध असणारी बाजारपेठ, मार्केटिंग करण्याच्या पद्धती, व्यवसायासाठी लागणारी जागा, प्रोजेक्ट रिपोर्ट, लागणाऱ्या मशिनरी, कॉस्टिंग आदींविषयी माहिती दिली जाईल.
जुन्या इमारतींचा पुनर्विकास
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे, त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला, त्याचा वापर कसा करायचा, फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात, पीएमसी म्हणजे काय आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ एप्रिलला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्द्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७