पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात

पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात
Published on

पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळा उत्साहात

घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) : हिंदी विद्या प्रचार समितीच्या रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान शाखे (स्वायत्त) तर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र प्रदान सोहळा शनिवारी (ता. ४) मोठ्या उत्साहात झाला. महाविद्यालयाच्या साबू हॉलमध्ये आयोजित या भव्य कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अभिमानाचे आणि आनंदाचे क्षण या वेळी अनुभवायला मिळाले.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण प्रा. डॉ. एम. एम. शर्मा (एमेरिट्स, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) उपस्थित होते. हिंदी विद्या प्रचार समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच समितीच्या संचालिका डॉ. उषा मुकुंदन, प्राचार्य डॉ. हिमांशू दावडा, उपप्राचार्य कॅप्टन प्रवीण नायक, डॉ. स्नेहा देऊस्कर, डॉ. किरण कोलवणकर आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. हिमांशू दावडा यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि गुणवत्ता यांचे महत्त्व पटवून दिले. जीवनात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, नैतिक मूल्ये आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.

यानंतर उपपरीक्षा नियंत्रक प्रा. प्रवीण नायक यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५चा अहवाल सादर करीत विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विविध उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एम. एम. शर्मा यांच्या हस्ते पदवी व पीएचडी पदवीधर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी त्यांच्या उत्कृष्ट यशाचे विशेष कौतुक करण्यात आले.
आपल्या भाषणात प्रा. डॉ. एम. एम. शर्मा यांनी कृतज्ञता, मार्गदर्शन आणि परिश्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. कोविड महामारीचा संदर्भ देत विज्ञानातील नवकल्पनांमुळेच मानवजातीला नवसंजीवनी मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपप्राचार्य डॉ. स्नेहा देऊस्कर यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. रचना आचार्य (जैव तंत्रज्ञान विभाग) व प्रा. नीलेश घाडगे (वाणिज्य विभाग) यांनी केले. याप्रसंगी मराठी विज्ञान परिषदचे सचिव ए. पी. देशपांडे हेमान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com