

नव्या मेट्रो लाइन बुधवारपासून सेवेत
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : एमएमआरडीएकडून उभारण्यात आलेल्या मेट्रो-९ दहिसर पूर्व-काशीगाव आणि मेट्रो-२बी मंडाळे-डायमंड गार्डन बुधवारपासून (ता. ८) मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या या दोन्ही मार्गिकांचे लोकार्पण झाल्यानंतर बुधवारी सकाळी ५.५० वाजल्यापासून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या झळा सोसत प्रवास करणाऱ्या मिरा रोड, भाईंदर आणि चेंबूर, मानखुर्द परिसरातील प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रात एमएमआरडीएकडून मेट्रोचे जाळे उभारले जात असून, सध्या मेट्रो-७ अंधेरी पूर्व-दहिसर आणि मेट्रो-२ अ अंधेरी पश्चिम-दहिसर या मार्गावर मेट्रो सेवा चालवल्या जात आहेत. उद्या मेट्रो-९ दहिसर पूर्व-काशीगाव आणि मेट्रो-२बी डायमंड गार्डन-मंडाळे या टप्प्याचे लोकार्पण होणार असून, बुधवारपासून त्या सेवेत येणार आहेत. दरम्यान, मेट्रो लाइन २अ आणि लाइन ७ या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहेत. त्यानुसार मेट्रो-७ ही मेट्रो मार्गिका-९ सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालणार आहे. त्यामुळे प्रवाशांना अंधेरी पूर्व गुंदवली ते मिरा-भाईंदर (काशीगाव)दरम्यान थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.
...
मार्गिकेनुसार सेवा
मेट्रो-२अ (पिवळी लाइन)
(अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व यादरम्यान आता स्वतंत्र मार्गिका म्हणून कार्यरत राहील.)
- पहिली गाडी सकाळी ५:५० ते ५:५५ दरम्यान
- शेवटची गाडी रात्री १०:३५- ११:०० दरम्यान
- गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी गाडी धावणार. इतर वेळी ८-१० मिनिटांनी फेरी
- दररोज २८९ फेऱ्या
- शनिवारी २३१, तर रविवारी २१३ फेऱ्या धावणार
...
मेट्रो-७ व मेट्रो-९
(हा संयुक्त कॉरिडॉर असून, गुंदवली ते काशीगाव गाड्या धावणार)
- पहिली गाडी सकाळी ५:५० वाजता सुटणार
- शेवटची गाडी रात्री सुमारे ११ वाजता
- गर्दीच्या वेळेत दर ५:५० मिनिटांनी फेरी
- इतर वेळी ८ ते १० मिनिटांनी फेरी
- दररोज २७६ फेऱ्या
- शनिवारी २२३ फेऱ्या, रविवारी २०५ फेऱ्या
----
मेट्रो-२बी (टप्पा १)
(महाराष्ट्रनगर-मंडाळे ते देशभक्त एन. जी. आचार्य उद्यान-डायमंड गार्डन, चेंबूर)
- पहिली गाडी सकाळी ६ वाजता
- शेवटची गाडी रात्री १०:१५-१०:३० दरम्यान
- दर ९ मिनिटे ३० सेकंदांनी फेरी
- दिवसभरात एकूण २०९ फेऱ्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.