मेट्रोच्या लोकार्पणासाठी वाहतुकीत बदल

मेट्रोच्या लोकार्पणासाठी वाहतुकीत बदल
Published on

मेट्रोच्या लोकार्पणासाठी वाहतुकीत बदल

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील मेट्रोच्या दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याचे मंगळवारी (ता. ७) मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित लोकार्पण होणार आहे. यासाठी पोलिसांकडून वाहतुकीच्या मार्गात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असून, मंगळवारी (ता. ७) सकाळी १० मुख्यमंत्री मेट्रोला दहिसर व काशीगाव या दोन्ही ठिकाणी हिरवा कंदील दाखवणार आहेत. या वेळी महत्त्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदी व काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत सर्व वाहनांना हाटकेश नाका, टाटा मोटर्स, विनयनगर कट या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार असून, त्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. हे बदल पोलिस वाहने, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सीजन गॅस वाहने व महसूल विभागाची वाहने, मुंबई, ठाणे, पालघर जिल्हा दंडाधिकारी व मुंबई, मिरा भाईंदर, वसई-विरार मनपा आयुक्त यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही, अशी अधिसूचना वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आली आहे.

असा असेल बदल...
मिरा-भाईंदर रस्त्यावरील काशीमिरा नाक्यावरून काशीगाव मेट्रो स्थानक येथील टाटा मोटर्सकडून उजवीकडे वळण घेऊन विनयनगरकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना कार्यक्रम कालावधीपुरता प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी वाहने मिरा-भाईंदर रस्त्यावरून सरळ काशीगाव मेट्रो स्थानक ते प्लेझंट पार्कमार्गे इच्छित स्थळी जातील.

पूजा पार्क चौक येथील अक्षर मेडिकल येथून टीपीएम व विनयनगर मार्गाकडून मिरा-भाईंदर मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या सर्व वाहनांसाठी बंदी करण्यात आली आहे. त्याऐवजी सर्व वाहने ही पूजा पार्क कॉर्नर येथून टीपीएम मार्ग तसेच विनयनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.

हटकेश रस्त्याकडून (जीसीसी हॉटेल) मिरा भाईंदर मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या सर्व वाहनांना डावे वळण घेऊन काशीगाव मेट्रो रेल्वे स्थानक व काशीमिरा नाक्याकडे येण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी सर्व वाहने मिरा-भाईंदर मुख्य रस्त्यावरील हटकेश नाका येथून उजवे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

काशीगांव मेट्रो स्थानक व टाटा मोटर्स या ठिकाणच्या विनयनगर रस्त्यावरील पूजा पार्क कॉर्नरपर्यंत, मिरा-भाईंदर मुख्य रस्त्यावरील प्लेझंट पार्क ते टाटा मोटर्सपर्यंतच्या काशीगाव मेट्रो स्थानक येथील रस्त्यांची दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com