रॅपिडो पार्सलच्या नावाखाली १५.७९ लाखांचा गंडा

रॅपिडो पार्सलच्या नावाखाली १५.७९ लाखांचा गंडा
Published on

रॅपिडोच्या नावाखाली १५ लाखांचा गंडा
ठाणे, ता. ६ : रॅपिडो ॲपवरील पार्सल डिलिव्हरीच्या नावाखाली भामट्यांनी तब्बल १५ लाख ७९ हजार रुपयांचे कॅमेरा साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना नौपाडा परिसरात समोर आली आहे.
नौपाड्यात राहणारे अथर्व किरण नाकती (२२) असे व्हिडिओग्राफरचे नाव असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी कामासाठी भाड्याने घेतलेले सोनी कंपनीचे एफएक्स-३ मॉडेलचे तीन कॅमेरे, महागडे लेन्स, सीएफ कार्ड, बॅटऱ्या व इतर साहित्य असे एकूण १५.७९ लाख रुपये किमतीचे उपकरण शनिवारी (ता. ४) रात्री रॅपिडो ॲपद्वारे गोरेगाव येथील कंपनीकडे पाठविण्यासाठी बुकिंग केले होते. त्यानुसार दोन दुचाकीस्वार त्यांच्या घरी आले. त्यांनी स्वतःला संबंधित डिलिव्हरी रायडर असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर नाकती यांनी संपूर्ण कॅमेरा साहित्य त्यांच्या ताब्यात दिले, मात्र काही वेळाने संबंधित कंपनीकडे पार्सल पोहोचले नसल्याचे समजताच फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी फोन उचलला नाही. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com