एका महिन्याचा खर्च २० कोटीच्या घरात

एका महिन्याचा खर्च २० कोटीच्या घरात
Published on

घनकचरा व्यवस्थापन वादात
एका महिन्याचा खर्च २० कोटींच्या घरात
विरार, ता. ७ (बातमीदार)ः वसई-विरार महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनावर महिन्याला १७ कोटी खर्च केले जात होते. मात्र, नव्या कंत्राटदाराने जवळपास २० कोटींच्या देयकाची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी महासभेत याबाबतची वस्तुस्थिती मांडण्याची मागणी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केली आहे.
महापालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात पालिकेचा खर्च कमी व्हावा, यासाठीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम जुन्या पद्धतीने सुरू आहे. मात्र, आताच्या खर्चापेक्षा कमी खर्च यावा, या दृष्टीने इतर पालिकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांचा अभ्यास करून निविदा काढण्यात आली आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असल्याचे स्पष्ट असताना दोन निविदा प्रक्रिया राबवल्याने ही प्रक्रिया वादात सापडली आहे.
==============================
कंत्राटदाराचा खर्च मोठा
नव्या कंत्राटदाराकडून योग्य साफसफाई केल्या जात नाही. आवश्यक मनुष्यबळदेखील लावण्यात आलेले नाही. अशा प्रकारच्या तक्रारी अनेक नगरसेवकांनी महासभेत केल्या. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी नव्या कंत्राटानुसार महिन्याला १४ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सांगितले, पण कंत्राटदारांनी दोन वेगवेगळी देयके सादर केली असून, त्याची रक्कम २० कोटींच्या घरात असल्याने नवा वाद उद्भवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com