

वटार प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू
विरार, ता. ७ (बातमीदार) ः विरार पश्चिमेतील वटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याने स्थानिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डेनिस डिमोंटे यांनी महापौरांना लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
वटार येथील आरोग्य केंद्र अजूनही पूर्णपणे सुरू झालेले नाही. त्यामुळे वटार परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी इतर ठिकाणी जावे लागते. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या मते, आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचारी, आवश्यक सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत. त्यामुळे केंद्र सुरू झाले असले तरी त्याचा नागरिकांना पूर्ण क्षमतेने फायदा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर विरार पश्चिमेतील वटार येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तत्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे. तसेच आवश्यक डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि मूलभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पत्रातून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.