मतदार यादी मॅपिंग त्वरित पूर्ण करा

मतदार यादी मॅपिंग त्वरित पूर्ण करा
Published on

मतदारांच्या सर्वेक्षणाला गती
वसई-विरार परिसरातील यादी अद्ययावतीकरण सुरू
विरार, ता. ७ (बातमीदार)ः वसई-विरार परिसरातील मतदार यादी अद्ययावतीकरण केले जात आहे. यासाठी बीएलओमार्फत मतदारांच्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर वसई-विरारचे महापौर अजीव पाटील यांनी मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
या प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव २००२ च्या मतदार यादीत होते की नाही, याची तपासणी करून खात्री करणे बंधनकारक आहे. ज्या नागरिकांची नावे २००२ च्या मतदार यादीत समाविष्ट नव्हती, त्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून आपल्या आई, वडील, आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणाही एकाची २००२ ची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक आहे. या माहितीत प्रामुख्याने संबंधित व्यक्तीचे संपूर्ण नाव, २००२ च्या यादीत नाव असलेले राज्य व जिल्हा, विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांकाचा अचूक समावेश असणे गरजेचे आहे. तसेच, विवाहित महिलांनी स्वतःच्या आई किंवा वडिलांची २००२ ची वरील सर्व सविस्तर माहिती बीएलओकडे जमा करणे अनिवार्य आहे. त्यामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेत योगदान देण्याचे आवाहन महापौर अजीव पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com