

हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम!
डेंगी-मलेरियासह संसर्गजन्य आजारांत वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : राज्यातील बदलत्या हवामानाचा थेट परिणाम आता सार्वजनिक आरोग्यावर दिसू लागला आहे. अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर डेंगी व मलेरियासारख्या डासजन्य आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वाढते तापमान, आर्द्रता आणि अनियमित पावसामुळे डासांची उत्पत्ती झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
काही वर्षांत हवामानातील टोकाच्या बदलांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, तर दुसरीकडे दुष्काळाचे सावट अशा दुहेरी संकटामुळे संसर्गजन्य आजारांना पोषक वातावरण तयार होत आहे. विशेषतः शहरी आणि उपनगरी भागात साचलेले पाणी, अपुरी स्वच्छता आणि अनियमित पावसाचे चक्र यामुळे डासांची पैदास वाढत आहे.
तज्ज्ञांच्या मते, केवळ औषधोपचार किंवा तात्पुरत्या उपाययोजनांनी ही समस्या नियंत्रणात येणार नाही. हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य व्यवस्था यांचा समन्वय साधून दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा भविष्यात राज्याला अधिक गंभीर आरोग्य संकटाचा सामना करावा लागू शकतो.
़़़़
डेंगी रुग्णसंख्या (५ वर्षे)
२०२१ : १२,७२०
२०२२ : ८,५७८
२०२३ : १९,०३४
२०२४ : १९,३८५
२०२५ : १४,१५९
(एकूण : ७३,८७६)
़़़
मलेरिया रुग्णसंख्या (५ वर्षे)
२०२१ : १९,३०३
२०२२ : १५,४५१
२०२३ : १६,१५९
२०२४ : २१,०७८
२०२५ : २०,०००
(एकूण : सुमारे ९२,०००)
बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.