शाहीर पांडुरंग कदम यांच्या शाहिरी कलेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल

शाहीर पांडुरंग कदम यांच्या शाहिरी कलेची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल
Published on

शाहीर पांडुरंग कदम यांच्या कार्याची दखल
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शुभेच्छा पत्र

प्रभादेवी, ता. ७ : वयाच्या ९७ व्या वर्षी वारेली (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील शाहीर पांडुरंग कदम यांचा शाहिरी बाणा अद्याप कायम आहे. त्यांच्या याच कलेची दखल विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली आहे.

दैनिक सकाळमध्ये सोमवारी (ता. ६) प्रसिद्ध झालेल्या शाहीर पांडुरंग कदम यांच्या बातमीची नोंद घेत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या वेळी त्यांच्या कलेच्या निष्ठा, जिद्द आणि समाजप्रबोधनाच्या तळमळीचा सन्मान डॉ. गोऱ्हे यांनी केला. तसेच त्यांना लेखी शुभेच्छा संदेश पत्रदेखील पाठविण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे यांच्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की, वयाच्या ९७ व्या वर्षीही आपण ज्या उत्साहाने, जोमाने आणि पहाडी दमदार आवाजात शाहिरी कलेचे सादरीकरण करत आहात, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. आपल्या कलेतील जिवंतपणा, ताकद आणि सामाजिक भान आजच्या पिढीसाठी एक अमूल्य वारसा आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेल्या कौतुकाची थाप, ‘माझी मैना गावाकडे राहिली’ सारख्या अजरामर सादरीकरणातून महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध जपणारी आपली कला आणि शाहिरी परंपरेचे जतन याचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे यांनी शाहीर कदम यांच्या कार्याला वंदनीय म्हटले आहे. या वेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शाहीर पांडुरंग कदम यांच्या आवाजातील शाहिरी ही सह्याद्री व आकाशवाणीवर रेकॉर्ड करून प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शाहीर पांडुरंग कदम यांची ही शाहिरी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची जाज्वल्य ओळख असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना उत्तम आरोग्य, समाधान आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्व असलेल्या नेत्यांनी मला दूरध्वनी करून माझे कौतुक केले. प्रोत्साहन दिले, यातच मी धन्य झालो हीच माझ्या कलेची खरी पोचपावती असल्याचे शाहीर पांडुरंग कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com