

ठाण्यात सर्व्हिस सेंटरमध्ये कारला आग
ठाणे, ता. ७ : वागळे इस्टेट परिसरातील पडवळनगर येथील फोक्सवॅगन सर्व्हिस सेंटरमध्ये मंगळवारी (ता. ७) सकाळी १०.४५च्या सुमारास एका कारला अचानक आग लागली. या घटनेत कारचे पूर्णतः नुकसान झाले असून, अग्निशमन दलाने तत्परता दाखवत शेजारी उभ्या असलेल्या इतर १० गाड्या सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वागळे इस्टेटमधील महावितरण कार्यालयामागे असलेल्या या सर्व्हिस सेंटरमध्ये ‘फोक्सवॅगन टाईगुन’ ही कार सर्व्हिसिंगसाठी आली होती. सकाळी १०.४५च्या सुमारास या कारने अचानक पेट घेतल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून वागळे अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाची तत्परता
आगीच्या ज्वाला वाढत असतानाच सेंटरमध्ये उभ्या असलेल्या इतर सुमारे १० गाड्या जवानांनी तातडीने बाहेर काढल्या. एक फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन आणि एक जम्बो वॉटर टँकरच्या साहाय्याने सकाळी ११.३० वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. खाक झालेली कार आयडीएफसी बँकेच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समजते. या वेळी श्रीनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, महावितरण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथकही हजर होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.