

कामोठे, ता. ७ (बातमीदार) : पनवेल वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयित व्यक्तीला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पनवेल शहर पोलिस करत आहेत.
पनवेल वाहतूक शाखेअंतर्गत डेरवली येथे हवालदार सतीश वाघमारे व राकेश गाडगे कर्तव्य बजावत होते. यावेळी ‘एस.के. डोर्स’ दुकानाचे मालक मोहम्मद रिजवान खान यांनी त्यांना माहिती दिली, दुकानासमोर सात ते आठ दिवसांपासून विनानंबर प्लेटची पांढऱ्या रंगाची दुचाकी उभी आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहतूक नियमनासोबतच संबंधित दुचाकीवर लक्ष ठेवले. दरम्यान, एक अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करत दुचाकीजवळ आली आणि स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने हँडल लॉक तोडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर कचऱ्यातून प्लॅस्टिकची बाटली उचलून पेट्रोल आणण्यासाठी निघून गेली. या हालचालींमुळे पोलिसांना संशय बळावला. त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांना घटनास्थळी पाठवण्यात आले. काही वेळातच संशयित व्यक्ती पेट्रोल घेऊन परत येताच पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान कागदपत्रांच्या आधारे मूळ मालकाशी संपर्क साधण्यात आला असता, मार्चमध्ये चेंबूर परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याचे उघड झाले. यानंतर वाहतूक पोलिसांनी संशयिताला पुढील कारवाईसाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.