

खारघर, ता. ७ (बातमीदार) : खारघर परिसरात सोमवारी (ता. ६) रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण परिसर जवळपास एक तास अंधारात बुडाला होता. अचानक पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला.
अनेक ठिकाणी इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सुविधा नसल्याने नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. या काळात उत्सव चौक परिसरातील ४०० केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. वीज खंडित झाल्यानंतर नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाशी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र अनेकांना प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वीज खंडित होण्याचे कारण महावितरण नसून महापारेषणकडील बिघाड होता. सुमारे एका तासात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, सध्या वीजपुरवठा नियमित सुरू आहे, अशी माहिती महावितरण खारघरचे अतिरिक्त अभियंता व्यंकट कासल यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.