सिडको वसाहतीसाठी पाच एमएलडी पाणी

सिडको वसाहतीसाठी पाच एमएलडी पाणी
Published on

खारघर, ता. ८ (बातमीदार) : जेएनपीए परिसरात होणारा पाच एमएलडी पाणीसाठा पनवेल परिसरातील सिडको वसाहतीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे लेखी आश्वासन सिडको प्रशासनाने पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांच्यासह नगरसेवक आणि रहिवाशांना दिल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

कामोठे, कळंबोली आणि खारघर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे, खारघरमधील सेक्टर ३० ते ४० परिसरात रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेता अरविंद पाटील यांनी नगरसेवक तुषार पाटील, प्रकाश म्हात्रे, काँगेसचे सुदाम पाटील यांच्यासह खारघर आणि कामोठे रहिवाशांसमवेत सिडको सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, तसेच सिडकोचे मुख्य कार्यकारी अभियंता शीला करुणाकरण यांची भेट घेत, सिडको वसाहतीमधील पाणी समस्या निदर्शनास आणून देत निवेदन दिले.

सिडकोने जेएनपीए परिसरात होणारा पाच एमएलडी पाणीसाठा पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीसाठी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दिले आहे. तसेच नवी मुंबईकडून २० दशलक्ष लिटर पाणी मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले आहे.
- अरविंद म्हात्रे, विरोधी पक्षनेता, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com