

रायगड पोलिसांचा विनाहेल्मेट चालकांना दणका
आठ दिवसांत दोन हजार ८०३ वाहनांवर कारवाई; २८ लाखांचा दंड वसूल
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : जिल्ह्यात येणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात दुचाकीवरून प्रवास करीत असतात. मात्र बहुतांश नागरिक हेल्मेटचा वापर करीत नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रायगड वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या विनाहेल्मेट प्रवास कारवाई अभियानांतर्गत २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील एकूण दोन हजार ८०३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. दुचाकी चालकांकडून २८ लाख तीन हजारांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या काही वर्षांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रायगड जिल्ह्यातील अपघातांत विनाहेल्मेट मृत्युमुखी पडलेल्या चालकांची संख्या जास्त आहे. २०२४ साली ११०, २०२५ साली १०४, तर फेब्रुवारी २०२६पर्यंत २२ जणांचा विनाहेल्मेट प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू झाला आहे. रायगड हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे शनिवार व रविवार तसेच इतर सार्वजनिक सुट्टीच्या वेळी रायगड जिल्ह्यात पर्यटनाकरिता येणारे अनेक पर्यटक हे दुचाकी घेऊन येत असतात. दरम्यान, हेल्मेटचा वापर करीत नाहीत. यामुळेच रायगड पोलिसांकडून विनाहेल्मेट प्रवास कारवाई अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील एकूण दोन हजार ८०३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. चालकांकडून २८ लाख तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महामार्गावर अधिक लक्ष
रस्त्यावर वाहन चालवताना वेग नव्हे, तर सुरक्षितता महत्त्वाची आहे. हेल्मेट हे फक्त नियम पाळण्यासाठी नाही, तर आपल्या जीवाचे संरक्षण करणारे कवच आहे, असा संदेश देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात रस्त्यांवर दुचाकी अपघातांत मृत होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळेच या मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात विशेषतः महामार्गावर कारवाई करण्यावर अधिक लक्ष दिले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण दोन हजार ८०३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे चालकांनी दंड टाळण्यासह आपला जीव धोक्यात जाऊ नये, यासाठी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.