पेण नगरपालिकेची १२.८९ कोटींची कर वसुली

पेण नगरपालिकेची १२.८९ कोटींची कर वसुली
Published on

पेण नगरपालिकेची विक्रमी करवसुली
पेण, ता. ७ (वार्ताहर) : पेण नगरपालिकेने आर्थिक वर्षात करवसुलीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्मचारी टंचाई आणि निवडणुकीच्या कामांचा व्याप असतानाही, पालिकेने तब्बल १२ कोटी ८९ लाख ५९ हजार ८० रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या प्रभावी मोहिमेमुळे हे यश मिळाले आहे.
यंदा तब्बल ८५ ते ९० टक्के करवसुली झाल्यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडली असल्याने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारीवर्गाचे कौतुक होत आहे. एकीकडे नगरपालिकेची वसुली मोहीम राबविण्यासाठी अनेक प्रकारची जनजागृती करत जाहीर दवंडीसुद्धा देण्यात आली. तसेच, सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवून कर भरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होते. नगरपालिकेच्या १२ प्रभागांमध्ये कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कामकाज करून नागरिकांच्या हरकती व सूचनांची योग्य दखल घेत बिलांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या. यामुळे नागरिकांचा विश्वास वाढला असल्याचे जीवन पाटील यांनी सांगितले.

वसुलीची आकडेवारी (२००२५-२६)
मालमत्ता कर ः ११ कोटी २३ लाख
पाणीपट्टी : १ कोटी ६६ लाख ५९ हजार ८०
एकूण टक्केवारी : ८५ ते ९० टक्के पूर्ण

पेण नगरपालिकेच्या आर्थिक वर्षात करवसुलीदरम्यान अपुरा कर्मचारीवर्ग त्यातच निवडणुकींची कामे यासह इतरही अनेक अडचणी होत्या. यावर मात करत करवसुलीची मोहीम यशस्वीपणे पार पाडली. लेखापाल किरण शहा, कर निरीक्षक गोविंद भिसे, वसुली विभागप्रमुख महेश वडके, संगणक अभियंता निकिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख व इतर कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने मालमत्ता व पाणीपट्टी कर वसुलीची कामगिरी पूर्ण झाली. यामुळे जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत पेण नगरपालिका अव्वल स्थानी आहे.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण नगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com