नौपाड्यात भरदिवसा तीन वाहनांची तोडफोड

नौपाड्यात भरदिवसा तीन वाहनांची तोडफोड
Published on

नौपाड्यात भरदिवसा तीन वाहनांची तोडफोड
मानसिक आजारातून कृत्य केल्याचे उघड
ठाणे, ता. ७ : मुंबई-नाशिक महामार्गावरील नौपाडा परिसरात मंगळवारी (ता. ७) सकाळी एका माथेफिरूने भरदिवसा तीन वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त असून, संतप्त वाहनचालकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला.

नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास ही घटना कालिका मंदिराजवळ घडली. जळगाव येथील सुनील राजधर वानखेडे याने लाकडी बांबूच्या सहाय्याने महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर अचानक हल्ला केला. अंधेरी येथील नफिज कामरुद्दीन शेख यांच्या कारच्या पुढील आणि मागील काचा त्याने फोडल्या. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका रिक्षावर आणि दुसऱ्या कारवरही त्याने हल्ला करत नुकसान केले.

वाहनचालकांचा संताप
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चालक आणि प्रवासी भयभीत झाले होते. मात्र, प्रसंगावधान राखून तीनही वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी या माथेफिरूला पकडले आणि त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक चौकशीत हा तरुण मानसिक आजाराने त्रस्त असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com