क्रिकेट प्रिमियर लिगमध्ये ‘सप्तबंधुचे शिलेदार’ संघ विजयी

क्रिकेट प्रिमियर लिगमध्ये ‘सप्तबंधुचे शिलेदार’ संघ विजयी
Published on

क्रिकेट प्रीमियर लिगमध्ये ‘सप्तबंधूचे शिलेदार’ संघ विजयी
प्रभादेवी, ता. ६ : सप्तबंधू क्रीडा मंडळ आयोजित सप्तबंधू प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वात अंतिम सामन्यात ‘सप्तबंधूचे शिलेदार’ या संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला असून, दोन्ही संघांनी चुरशीची लढत दिली.
वरळी गांधीनगर येथील सप्तबंधू क्रीडा मंडळाच्या वतीने परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. यात स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजयी संघाला शिवसेना नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, खजिनदार ईश्वर बडवानाचे तसेच यश पाटील, विजय पाटील, निखिल मेजारी, अजित पाटील, नूर शेख, सूरज कांबळे, शुभम यादव, सागर जोशी, तेजस देसाई, साहील मेजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच महिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ‘सप्तबंधूच्या रणरागिणी’ संघाने विजेतेपद मिळवले. विजेत्या संघाला शिवसेना वरळी विभाग अधिकारी आकर्षिका पाटील यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. प्रीमियर लिगमध्ये परिसरातील विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. स्पर्धेनंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com