

ठाणे स्थानकावर लिफ्ट-सरकते जिने अपुरे
गर्दीच्या वेळी प्रवाशांची झुंबड, चेंगराचेंगरीची भीती
ठाणे, ता. ७ : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गजबजलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे आठ लाख प्रवासी ये-जा करतात; मात्र या प्रचंड प्रवासीसंख्येच्या तुलनेत उपलब्ध लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची (एस्कलेटर) संख्या अत्यंत अपुरी असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गर्दीच्या वेळी या सुविधांचा वापर करताना प्रवाशांची मोठी झुंबड उडत असून, एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे रेल्वे स्थानकात एकूण १० फलाट असून, येथून मध्य रेल्वे, हार्बर लाइन आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांची मोठी वर्दळ असते. सध्या स्थानकावर केवळ चार लिफ्ट आणि आठ एस्कलेटर कार्यान्वित आहेत. लोकलमधून उतरल्यानंतर शेकडो प्रवासी एकाच वेळी या सुविधांकडे धाव घेतात, ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर धक्काबुक्की आणि गोंधळाची स्थिती निर्माण होते.
नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक बिघाड
लिफ्टचा वापर प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या सर्वच प्रवासी लिफ्टचा वापर करत असल्याने या यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. अनेकदा प्रवाशांच्या अतिघाईमुळे किंवा काही खोडकर प्रवृत्तींमुळे या सुविधा तांत्रिक बिघाड होऊन बंद पडतात, असा दावा रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनांकडून केला जात आहे.
..............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.