

रंगारींच्या सुरक्षेची एैसीतैशी
पालघरमधील रंगरंगोठीच्या कामांमध्ये दुर्लक्ष
पालघर/ बोईसर, ता.७ : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांची रंगरंगोठीची कामे सुरू आहेत. पण कामासाठी नेमलेल्या कामगारांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
उंच घुमटावर सुरू असलेल्या कामात कामगारांच्या जीविताशी उघडपणे खेळ केला जात आहे. या कामगारांना उंचावर जाण्यासाठी केवळ दोरीला बांधलेल्या लाकडी शिडीचा वापर केला दाक आहे. तसेच काही कामगार सेफ्टी बेल्ट, हेल्मेटसारखी अत्यावश्यक साधने वापरत नसल्याने अपघातामुळे जीवीतहानी होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे, सर्व कामे शासकीय कार्यालयांच्या समोर सुरू असूनही सुरक्षेच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
---------------------------
कायदेशीर कारवाईची मागणी
रंगरंगोटीचे काम ‘अटळ एंटरप्राइजेस’मार्फत सुरू असून, सुरक्षेच्या नियमांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने ठेकेदारावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणात संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.
----------------------------
जोपर्यंत सुरक्षेचे साधन वापरत नाही, तोपर्यंत काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
- सचिन खलाणे, सरकारी कामगार अधिकारी, पालघर
--------------------
माझ्या साइटवर माझा सुपरवायझर नवीन आहेत. त्यांच्याशी मी बोलतो.
- राकेश शिंदे, प्रोजेक्ट मॅनेजर, अट्ल इंटरपाईजेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.