मेट्रोचे स्वप्न आठ वर्षांनी साकार !

मेट्रोचे स्वप्न आठ वर्षांनी साकार !
Published on

आठ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम
मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत मेट्रो दाखल, मुंबईपर्यंतचा प्रवास सुखकर

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर मेट्रोचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला. या सुविधेमुळे तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिरा-भाईंदरकरांचा मुंबईपर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
दहिसर ते काशीगाव हा मेट्रोतून बुधवारपासून (ता. ८) प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या सुविधेमुळे मिरा रोड, काशी मिरा भागात राहणाऱ्या नागरिकांची दहिसर चेकनाक्याजवळ होणाऱ्या कोंडीतून सुटका होणार आहे. तर दहिसर येथून मेट्रोने मुंबई गाठणाऱ्यांना मिरा-भाईंदरमधून थेट अंधेरीपर्यंतचा प्रवास करता येणार आहे.
-------------------------
अडथळ्यांची शर्यत
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये दहिसरपर्यंत आलेली मेट्रो मिरा-भाईंदरमध्ये आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. २०२२ पर्यंत मेट्रोचे काम पूर्ण होणार होते; मात्र कोरोनाने पहिला टप्पा सुरू होण्यास २०२६ उजाडले होते.
------------------------------
मेट्रोची वैशिष्ट्ये
पहिला टप्पा (दहिसर ते काशीगाव)
• लांबी : ४.७ किमी
• स्थानके : ४
• स्थानकांची नावे : दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव, काशीगाव
• रेड लाइन कनेक्शन : मेट्रो मार्ग-९ हा मेट्रो मार्ग-७ (दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व) आणि मार्ग-७ अ (अंधेरी पूर्व-छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) यांच्या माध्यमातून रेड लाइनशी जोडला जातो.
• प्रमुख फायदा
दहिसर टोल नाका येथील प्रचंड वाहतूक कोंडी कमी होईल. रस्त्यांवर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होऊ शकते; परिणामी, गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाह अधिक सुरळीत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com