

ठाण्यातील काही भागांत शनिवारी पाणीबाणी
जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी २४ तास पुरवठा बंद
ठाणे, ता. ७ : महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील माजिवडा जंक्शन येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. या गळतीमुळे पाणी वाया जाण्यासोबतच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. ही गळती तातडीने थांबवण्यासाठी शनिवारी (ता. ११) सकाळी ९ ते रविवारी (ता. १२) सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कपातीच्या काळात नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीच्या कामामुळे गोल्डन डाईज माजिवडा जंक्शन येथील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवावा लागणार आहे. वाहनचालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे
हे भाग बाधित
कळवा, खारेगाव, पारसिक नगर, आतकोनेश्वर नगर, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, कोपरी कोळीवाडा, राबोडी १ व २, बाळकुम, लोढा अमारा, ब्रह्मांड, रुतु सिटी, लोकमान्यनगर, इंदिरानगर, सावरकर नगर, किसननगर, श्रीनगर, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, वर्तकनगर, कोरस नक्षत्र, दोस्ती कॉम्प्लेक्स, समतानगर, चरई, कोलबाड आणि खोपट यांसह मुंब्रा व माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील बहुतांश परिसराचा यात समावेश आहे.
.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.