

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : कोपरी गावात आई गावदेवी चैत्रोत्सव पार पडला. या उत्सवादरम्यान सोमवारी (ता. ६) संध्याकाळी गावदेवी पालखीचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी सोहळ्यात गावातील शेकडो ग्रामस्थांनी सहभाग घेत गावदेवीचा जयघोष करीत एकच जल्लोष केला.
चैत्र सुरू झाला की प्रत्येक गावोगावी जत्रा हे समीकरण ठरलेले असते. त्यात आगरी-कोळी लोकांच्या गाववदेवीची जत्रा म्हणजे एक प्रकारचा उत्सवच. या जत्रांची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहात असतात. या जत्रा येथील स्थानिक आपापल्या परीने साजऱ्या करतात. वाशीतील सेक्टर २६ कोपरी गाव येथील ग्रामस्थदेखील आपली परंपरा कायम राखत चैत्रोत्सव साजरा करतात. यंदा सोमवारी (ता. ६) व मंगळवारी (ता. ७) हा सोहळा साजरा करण्यात आला. सोमवारी गावात गावदेवी पालखी मिरणूक काढण्यात आली. पालखी दिवशी गावदेवीचा अभिषेक सोहळा पार पडला. सुशांत परशुराम पाटील, नगरसेविका डॉ. प्रणाली पाटील तसेच अक्षय तुळशीराम ठाकूर, कोमल ठाकूर या दाम्पत्यांच्या हस्ते देवीचा अभिषेक सोहळा पार पाडला. त्यानंतर पालखीला सुरुवात झाली.
पालखी सोहळ्यात गावातील ज्येष्ठांसहित महिला, तरुणांनी सहभाग घेतला, तर लहान मुला-मुलींनी पारंपरिक आगरी-कोळी वेशभूषा परिधान करून गाण्यांवर ठेका धरला. गावातील घराघरामध्ये पालखीचे मनोभावे स्वागत करून औक्षण करण्यात आले. तसेच मंगळवारी सत्यनारायण पूजा व भंडारा आयोजित केला होता. दोन दिवस सुरू असलेल्या या उत्सवात बायांची गाणी, सहजयोग परिवार तसेच गावातील भजनी मंडळाची भजने पार पडली. त्यामुळे दोन दिवसांच्या या उत्सवावेळी कोपरी गावात भक्तिमय वातावरण दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.