१२७ गावांमध्ये निवडणुकीचे बिगुल

१२७ गावांमध्ये निवडणुकीचे बिगुल
Published on

राजकीय डावपेचांना वेग
जिल्ह्यातील १२७ गावांमध्ये २८ एप्रिलला मतदान
पालघर, ता. ७ ः पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या सरपंच, सदस्यांच्या जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामुळे ग्रामीण भागात राजकीय डावपेचांना वेग आला आहे.
पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी सदस्यांचे राजीनामे, निधन, अपात्रता किंवा इतर कारणांमुळे जागा रिक्त होत्या. त्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने गावात आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे नवीन विकासकामांच्या घोषणा तसेच उद्घाटनांवर निर्बंध आले आहेत.
---------------------------
राजकारण तापणार
ग्रामपंचायत पातळीवरील निवडणुकांना स्थानिक राजकारणात मोठे महत्त्व असते. सरपंच, सदस्य पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गावागावांत प्रचाराचे वातावरण रंगू लागले आहे. विविध राजकीय पक्ष तसेच स्थानिक आघाड्यांनीही उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
---------------------------
पोलिस प्रशासन सतर्क
निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
----------------------
निवडणूक कार्यक्रम
अर्ज करण्याची तारीख : ७ ते १३ एप्रिल
अर्जाची छाननी : १५ एप्रिल
अर्ज माघार घेण्याची तारीख : १७ एप्रिल
मतदान : मंगळवार २८ एप्रिल सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत
निकाल : २९ एप्रिल
----------------------------
तालुका - ग्रामपंचायत सदस्य सरपंच
पालघर - ४१ ६१ ६
वसई - ६ ७ ०
डहाणू - २९ ४० २
तलासरी - ३ ४ ०
वाडा - १८ २२ २
विक्रमगड - ११ १० १
जव्हार - १० १० २
मोखाडा - ९ १४ २
एकूण - १२७ १६८ १५

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com