

नाला बंदिस्त करून उभारणार चार्जिंग स्टेशन
हिरानंदानी मेडोजमधील रहिवाशांना दिलासा
ठाणे, ता. ७ : उघड्या नाल्याच्या उग्र दुर्गंधीमुळे त्रस्त असलेल्या ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील हजारो रहिवाशांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हा नाला पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर बंदिस्त करून त्यावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
हिरानंदानी मेडोज परिसरातील सुमारे ३०० फूट लांबीचा नाला उघडा असल्याने आणि त्यात सांडपाणी सोडले जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत रहिवाशांनी ‘जनसेवकाचा जनसंवाद’ कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते.
आमदार संजय केळकर यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांसोबत या नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी स्थानिक नगरसेविका स्नेहा आंब्रे, पालिका अधिकारी खंडागळे आणि नागरिक उपस्थित होते. पाहणीदरम्यान केळकर यांनी या नाल्यावर स्लॅब टाकून त्या जागेचा वापर चार्जिंग स्टेशनसाठी करण्याची सूचना केली. यामुळे परिसराचे सौंदर्यीकरण होईलच, शिवाय महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा न पडता महसूलही प्राप्त होऊ शकेल.
कामाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
या अभिनव प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. "पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प राबवल्यामुळे कामाला गती मिळेल आणि रहिवाशांची दुर्गंधीपासून कायमची सुटका होईल," असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.