आमदार कथोरेंनी हत्येची सुपारी दिल्याचा दावा!

आमदार कथोरेंनी हत्येची सुपारी दिल्याचा दावा!
Published on

आमदार कथोरेंनी हत्येची सुपारी दिल्याचा दावा!
व्यावसायिकांचे आरोप कथोरेंनी फेटाळले

अंबरनाथ, ता. ७ (वार्ताहर) ः येथील व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आमदार किसन कथोरे यांनी त्यांच्या हत्येची सुपारी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याला दिल्याचा गंभीर आरोप करीत खळबळ उडवली. लकडावाला याने लिहिलेल्या पत्राचा हवाला देत पनवेलकर यांनी हा दावा केला.
पनवेलकर यांनी सांगितले, की मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असलेल्या लकडावालाने बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याला पाठवलेल्या पत्रात २०२३च्या अखेरीस घडलेल्या एका घटनेचा उल्लेख आहे. त्या वेळी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आले असताना काही व्यक्तींनी लकडावालाची भेट घेऊन आमदार कथोरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे बोलणे करून दिल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. बदलापूर स्थानकाजवळील जमिनीच्या वादातून पनवेलकर यांचा ‘काटा काढण्याचे’ (हत्या करण्याचे) काम कथोरे यांनी सांगितल्याचेही पत्रात नमूद असल्याचे पनवेलकर यांनी सांगितले. मात्र लकडावालाने हे काम करण्यास नकार दिल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेलकर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत दोन वर्षांपूर्वी हुतात्मा चौकाजवळील त्यांच्या कार्यालयावर दुचाकीस्वारांकडून गोळीबार झाल्याची आठवण करून दिली. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती; मात्र अद्याप संरक्षण मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
या आरोपांमुळे ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
...
कथोरेंनी आरोप फेटाळले!
आमदार किसन कथोरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ते निराधार असल्याचे सांगितले. माझ्या राजकीय कारकिर्दीत कधीही गुंडगिरीला थारा दिलेला नाही. माझा कोणत्याही गँगस्टरशी संबंध नाही. माझी प्रतिमा खराब करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे, असे कथोरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com