

मध्य रेल्वेवर प्रवाशांचा ''मरणप्रवास''
स्थानकांवरील समस्यांमुळे सुरक्षा ऐरणीवर!
ठाणे, ता. ७ : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांची संख्या दररोज वाढत असताना, रेल्वे प्रशासनाचे नियोजन मात्र कोलमडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ठाणे ते कर्जत, कसारा दरम्यानच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मूलभूत सोयी-सुविधांचा मोठा अभाव असून, अपुरी विकासकामे आणि तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः मुठीत आहे. कुठे लिफ्टचा पत्ता नाही, तर कुठे अरुंद जिन्यांमुळे चेंगराचेंगरीची भीती निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळणाऱ्या ''सापत्न'' वागणुकीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट असून, ''अमृत भारत'' योजनेसारख्या घोषणा केवळ कागदावरच राहतात की काय, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.