आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
Published on

आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा
मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), शासकीय तंत्र प्रशाला, द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रम असलेल्या विद्यालयांमध्ये राज्यव्यापी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य’ असा या स्पर्धेसाठी विषय ठेवण्यात आला आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये विभागण्यात आली आहे. पहिल्या गटात आयटीआय, डिप्लोमा, बायफोकल आणि एमसीव्हीसीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी निबंधाची शब्दमर्यादा ५०० ते ८०० शब्दांची आहे. दुसरा गट पुरुष व महिला खुला गट असून, यासाठी शब्दमर्यादा ८०० ते १,२०० शब्दांची ठेवण्यात आली आहे. यासाठी दिलेल्या Google Form लिंकवर (https://forms.gle/RcFPhcUgYCX८PQNT) निबंध अपलोड करावा लागेल. निबंध सादर करताना स्पर्धकांनी आपले पूर्ण नाव, गट क्रमांक, संपर्क क्रमांक, शाळा किंवा महाविद्यालयाचे नाव आणि संपूर्ण पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. १४ ते २० एप्रिल या कालावधीत निबंध स्वीकारले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com