लिंक रोडवर घाणीचे साम्राज्य

लिंक रोडवर घाणीचे साम्राज्य
Published on

लिंक रोडवर घाणीचे साम्राज्य
अनेक वर्षांपासूनची समस्या आजही कायम

घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) : घाटकोपर-अंधेरी लिंक रोड येथील अल्ताफनगर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे दोन महिन्यांपूर्वी या रस्त्यावर साचलेला कचरा आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत विकासाचा आराखडा मांडला. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसून, समस्या आजही कायम आहे. २००६ ते २००८ दरम्यान लिंक रोडच्या कामासाठी हजारो झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र त्या कारवाईनंतर उरलेला कचरा, माती आणि बांधकामाचा राडारोडा आजही पूर्णपणे हटविण्यात आलेला नाही. दोन महिन्यांपूर्वी पालिकेने काही प्रमाणात साफसफाई केली असली तरी रस्त्याचे काम अद्याप अपूर्णच आहे.

अर्धवट रस्ता, साचलेला कचरा आणि गटारातून थेट रस्त्यावर वाहणारे सांडपाणी यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. परिणामी डेंगी, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
दुसरीकडे रस्ते विभागाकडून लवकरच काम सुरू होणार असल्यामुळे आम्ही गटार बांधकाम थांबवले होते. कारण काम सुरू झाल्यावर पुन्हा ते तोडावे लागले असते. तरीही आम्ही या प्रकरणाचा पुन्हा पाठपुरावा करीत असल्याची माहिती ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन खजुरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com