अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक ; शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक ; शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
Published on

अल्पवयीन मुलीवर
अत्याचार; एक अटकेत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : सातवर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे.
अत्याचार करणाऱ्या बिहार येथील व रामलड्डू मदेश्वर यादव (४५) या नराधमाला नौपाडा पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार (ता. १०)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी हा तीन दिवसांपूर्वी बिहार येथून आला होता. सोमवारी (ता. ६) रात्री नौपाडा परिसरात ही घटना घडली असल्याचे उघडकीस आले आहे, तर पीडित मुलीचे वडील हे बिगारी काम करत असून, ते तेलंगण येथील रहिवासी आहेत. पीडित मुलीचे वडील पीडित मुलीसह तिच्या लहान बहिणीला घेऊन काम शोधण्यासाठी आले होते. त्या वेळी मुलींसह ते ठाण्यात राहिले. याचदरम्यान हा प्रकार घडला असून, याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यादव याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस आधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com