नवी मुंबई विमानतळाचा २०२६मध्ये विस्तार

नवी मुंबई विमानतळाचा २०२६मध्ये विस्तार
Published on

नवी मुंबई विमानतळाचा २०२६मध्ये विस्तार
सिडकोची अर्थसंकल्पात कोट्यवधीची तरतूद

सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्‍घाटन केल्यानंतर आता या विमानतळाला विस्ताराचे वेध लागले आहेत. सिडकोने सादर केलेल्या २०२६-२७ या अर्थसंकल्पामध्ये विमानतळाच्या विस्तारातील पायाभूत सुविधांसाठी ५८ कोटींची अतिरिक्त तरतूद केली आहे.
सिडको आणि अदाणी यांच्या भागीदारीत स्थापन केलेल्या एनएमआयएएल या कंपनीमार्फत तब्बल १९ हजार ६४७ कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यतेतून नवी मुंबई विमानतळ साकारण्यात येत आहे. सिडकोने सुमारे तीन हजार कोटी रुपये दिले आहेत, इतर अदाणींनी उभारले आहेत. आता विमानतळाचा दुसऱ्या टप्प्यातील विकास करण्यात येत आहे. गतवर्षी हे विमानतळ कार्यान्वित झाले आहे. सध्या दररोज ७६ शहरांसोबत सुमारे १५० विमानांद्वारे वाहतूक सुरू आहे. सुमारे १९ हजार प्रवाशांची दररोज वाहतूक होत आहे. विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी दोन कोटी प्रवासी आणि ०.५ दशलक्ष टन मालवाहतुकीची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. सध्या तीन हजार ७०० मीटर लांबीची धावपट्टी मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी सक्षम तयार करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात टर्मिनल-२ इमारत, सेंट्रल टर्मिनल कॉम्प्लेक्स, मल्टिमोडल ट्रान्स्पोर्ट हब आणि जनरल एव्हिएशन टर्मिनल उभारण्याची योजना सिडकोने आखली आहे. त्याकरिता सिडकोने ५८ कोटींची अतिरिक्त तरतूद केली आहे. तसेच या सर्व सुविधांसोबत तरघर येथे वॉटर टॅक्सी सेवा तयार केली जाणार आहे. मुंबईतील कुलाबा येथून थेट प्रवाशांना नवी मुंबई विमानतळ जलमार्गे गाठता येणार आहे.
...
कार्गो हबचे काम सुरू
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून ०.५ मेट्रिक दशलक्ष टन इतकी मालवाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी सध्या एनएमआयएएलतर्फे फेडएक्स कार्गो हब सुरू करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले असून काम सुरू करण्यात आले आहे.
...
सिडकोचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, दळणवळण आणि दर्जेदार गृहनिर्माणाबाबतच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देणारा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, एरोसिटीचा विकास तसेच प्रस्तावित एज्युसिटी आणि मेडिसिटी यासोबत मेट्रो लाइन व लाइनद्वारे वाढलेले दळणवळण, तसेच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क आणि इतर धोरणात्मक विकास उपक्रमांच्या जोरावर नवी मुंबई एक प्रमुख आर्थिक व गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे.
- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com