

गौतम बिऱ्हाडे यांनी स्वीकारला ‘एमएमआरसी’चा पदभार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या संचालक (प्रकल्प)पदी गौतम बिऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी मंगळवारी (ता. ७) पदभार स्वीकारला. बिऱ्हाडे हे भारतीय रेल्वे सेवा अभियंता कॅडरमधील वरिष्ठ अधिकारी असून, त्यांना भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल प्रकल्पांमध्ये ३३ वर्षांहून अधिक अनुभव आहे.
बिऱ्हाडे यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर येथून अभियांत्रिकीची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. बहुविध पायाभूत प्रकल्पांचे नियोजन, रचना, अंमलबजावणी आणि कार्यान्वयन यामध्ये त्यांचा व्यापक अनुभव आहे. विशेषतः भूमिगत व उन्नत मेट्रो मार्गिका, पूल आणि रेल्वे प्रणाली या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘एमएमआरसी’मध्ये येण्याआधी ते पुणे येथील महामेट्रोमध्ये कार्यकारी संचालक (भूमिगत) म्हणून कार्यरत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.