दहिसर-अंधेरीसह घोडबंदर वाहतूक कोंडी होणार कमी

दहिसर-अंधेरीसह घोडबंदर वाहतूक कोंडी होणार कमी
Published on

दहिसर-अंधेरीसह घोडबंदरची कोंडी कमी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा टनेल बोरिंग मशीनद्वारे मंगळवारी (ता. ७) आरंभ करण्यात आला. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळे दहिसर-अंधेरी मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था सुलभ करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा टनेल बोरिंग मशीनद्वारे आरंभ करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत सहापदरी मार्गाची निर्मिती होणार असून, प्रत्येक बोगद्यात वाहतुकीसाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र मार्गिका असतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असलेला हा प्रकल्प आता एमएमआरडीएकडे वर्ग करण्यात आला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत असून, मेघा इंजिनिअरिग हे काम करीत आहे. यासाठी सुमारे १६ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या बोगद्यामुळे सध्या लागणारा ९० मिनिटांचा वेळ अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होणार असून, २३ किमी अंतर १२ किमीवर येणार आहे. मे २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासाठी दोन टीबीएमचा वापर करण्यात येत असून, त्यांना ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ अशी नावे देण्यात आली आहेत. टीबीएम शिल्ड तंत्रज्ञानामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. या बोगद्यामुळे दहिसर-अंधेरी मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल तसेच घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. हा बोगदा देशातील सर्वात मोठा आणि खोल शहरी बोगदा ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पर्यावरणीय दृष्टीनेही सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या असून, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बोगदा जात असल्याने जैवविविधतेला कोणतीही हानी होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच ११ हजार वृक्षलागवडीचा संकल्पही करण्यात आला आहे. हा प्रकल्प ‘इंजिनिअरिंगचा चमत्कार’ असल्याचे सांगत भविष्यात बांद्रा सी लिंकपासून विमानतळापर्यंत बोगदा तयार करण्याची योजना असल्याचेदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश एकात्मिक करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com